मृदा संधारण व त्याची गरज
नैसर्गिक साधनसंपत्तीच्या व्यवस्थापनामध्ये मृदा आणि जल संधारणाला अन्यन्य साधारण महत्त्व आहे. मृदा आणि जलसंधारणाच्या कार्यक्रमामध्ये मृदा संधारणाला विशेष प्राधान्य दिले जाते.कारण पाण्याचा विचार केला असता दरवर्षी जलचक्रामुळे कमी-जास्त प्रमाणात तरी पाऊस पडतो, परंतु मृदा निर्मितीची प्रक्रिया ही त्यामानाने प्रदीर्घ काळाची आहे. निसर्गात हवा, पाणी, सूर्याची उष्णता या विविध कारकांमुळे खडकांची झीज होते आणि खडकांचा भुगा तयार होतो. कालांतराने त्यामध्ये विविध जैविक घटक मिसळतात आणि त्याचे मृदेमध्ये म्हणजेच मातीमध्ये रुपांतरण होते. अशाप्रकारे एक इंच मातीचा थर तयार होण्यासाठी साधारणत: 400-1000 वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे मातीचे संवर्धन ही काळाची गरज आहे.मातीची धूप – दुष्परिणाम
• शेतीच्या दृष्टीने विचार केला असता, मातीचा वरचा फक्त चार इंचाचा थर शेतीसाठी उपयुक्त असतो. त्याला इंग्रजीत टॉप सॉईल (Top Soil) असे म्हणतात. कारण याच थरामध्ये पिकांच्या वाढीसाठी लागणारी सर्व पोषकद्रव्ये सामावलेली असतात. जर मातीच्या संवर्धनाच्या उपाययोजना केल्या नाहीत तर पाण्यासोबत पोषकद्रव्ये सुद्धा वाहून जातात. परिणामी जमीनीची सुपिकता कमी होते. पिकांची उत्पादकता घटते आणि शेतकर्यााला रासायनिक खते आदी बाह्य साधनांचा आधार घ्यावा लागतो.
• काही ठिकाणी मातीचा थर हा मर्यादीत असतो, अशा ठिकाणी होणार्याम धूपेमुळे हळूहळू संपूर्ण मातीचा थरच वाहून जातो आणि खडक उघडा पडतो. अशा ठिकाणी भविष्यात पुन्हा शेती करणेच अशक्यप्राय होऊन बसते.
• धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मृदा संधारणेची कामे केलेली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ प्रवाहासोबत वाहून आणला जातो आणि धरणात येऊन साठतो. गेल्या काही वर्षात अशा प्रकारे हजारों टन गाळाचे संचयन धरणात झालेले आहे. परिणामी धरणाची पाणी साठवणुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. याचे गंभीर परिणाम आपल्याला नजीकच्या काळात भोगावे लागणार आहेत. यामुळे मृदा संधारण गरजेचे बनले आहे.
5 डिसेंबर - जागतिक मृदा संवर्धन दिन..
- अधिकाधिक उत्पादनाबरोबरच जमिनीचा पोत टिकविणे महत्त्वाचे
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक विकसनशील देशात विकासाकडे वाटचाल सुरु असते. देशांतर्गत स्थानिक साधन संपत्तीचा पूरेपूर उपयोग करुन किफातशीर ठरणाऱ्या क्षेत्राला प्राधान्यक्रम दिला जातो. त्याचाच भाग म्हणून औद्योगिक विकास, कृषि विकास व अन्य क्षेत्रातील विकासाचे विविध पैलूंचा अभ्यास करुन विकास प्रक्रियेची दिशा ठरविली जाते. त्यानुसार नियोजन केले जाते. भारतात आजदेखील लोकसंख्येचा मोठा घटक असल्याने देशात शेती व्यवसायाला अनन्य साधारण महत्व आहे. पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता नसल्याने आहे त्या क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येची गरज भागविताना शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली. अधिक उत्पादन देणारे वाण, रासायनिक खते, किटकनाशके,तणनाशके, बुरशीनाशके इत्यादीचा वापर केल्यामुळे आपण अन्नधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण झालो. स्वातंत्र्यानंतर दोन वेळा हरित क्रांती घडवून शेती व्यवसायातील क्षमता आपल्या देशाने सिद्ध केली आहे. हे सर्व करत असतांना उत्पादन वाढविणे हे प्रमुख उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन उत्पादन ज्या जमिनीत आपण घेत आहोत तिचा पोत राखण्यात आपण कमी पडलो. रासायनिक खते व किटक नाशकांमुळे उत्पादनात वाढ झाली खरी पण नत्र, स्फुरद आणि पालाश युक्त खतांची जमिनीची गरज पूर्ण होऊ शकली नाही. ज्यामुळे जमिनीचा पोत टिकण्यास मदत होते ते सेंद्रिय पदार्थ जमीनीत टाकण्याचे प्रमाण कमी झाले. पर्यायाने जमिनीचे आरोग्य बिघडणेस मदत झाली. सुपीक असलेल्या जमिनी नापीक होत चालल्या.
पीक उत्पादनातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जमीन. अनादी काळापासून शेतकरी
जमीनीत विविध पीके घेत आला आहे. पूर्वीच्या काळात सेंद्रिय पदार्थ जमिनीत
टाकण्याचे प्रमाण जास्त होते. सहाजिकच जमिनीचा पेात टिकण्यास आपोआप मदत होत
असे. अन्नधान्याची गरज जशी वाढू लागली, तसा जमिनीतून अधिकाधिक उत्पादन
काढण्याकडे कल वाढत गेला. त्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या तसेच संकरित
वाणांचा वापर वाढत गेला. या वाणांमधून अधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक
खतांचा वापर मोठया प्रमाणात सुरू झाला. सिंचनाच्या विविध सोयी उपलब्ध
झाल्या. सर्व हंगामात पिके घेतली जाऊ लागली. बागायत क्षेत्रात पिके घेताना
आंतरपिके, दुबारपिके, इत्यादी पीक पद्धती पुढे आल्या. पर्यायाने पीक घनता
वाढली. याच क्षेत्रातून अन्नद्रव्यांचे जास्तीत जास्त शोषण सुरू झाले.
त्यातच सध्या रासायनिक खतांच्या किंमती लक्षणीयरीत्या वाढत असून जमिनीची
अन्नद्रव्यांची गरजसुध्दा वाढत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा कमी
किंमतीत जी खत उपलब्ध होतील. ती जमिनीत टाकण्याकडे कल वाढत चालला आहे.
मूलद्रव्यांच्या असमतोल वापरामुळे मूलद्रव्यांची जमिनीत कमतरता जाणवू लागली
आहे. जमिनीला पुरविण्यात येणाऱ्या अन्नद्रव्यांपैकी एखादेच अन्नद्रव्य
पुरवून जमिनीत सुपीकता वाढत नाही. त्यामुळे रासायनिक खतांची मात्रा देऊनही
अलीकडे उत्पादकता वाढीस मर्यादा येत आहेत. रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी
होण्याचे मुख्य कारण म्हणजे सेंद्रिय खताचा अभाव आणि रासायनिक खतांचा आणि
पाण्याचा असंतुलित व बेसुमार वापर या सर्व कारणांमुळे नैसर्गिक जमिनीचे
भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माची झालेली हानी. यामुळे जमिनीमधील
सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण घटत असून जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत आहे.
तसेच जमिनीमधील उपयुक्त जीव जिवाणूंची संख्या घटत आहे.
रासायनिक खतांच्या असंतुलीत व बेसुमार वापरामुळे जमिनीत जैविक घटकांचा विनाश होऊन जमिनी मृतवत झाल्या. पर्यायाने खतांची कार्यक्षमताही कमी झाली. कमी कार्यक्षमतेमुळे पुन्हा वाढीव वापर आणि पुन्हा जमिनीचा ऱ्हास दृष्टचक्रात आधुनिक उत्पादन पध्दती अडकलेली आहे. या सगळयांचा परिणाम म्हणून उत्पादन खर्च वाढला पण दुसरीकडे उत्पादकतेमधे भरीव वाढ झाली नाही आणि पर्यायाने शेती तोटयात जाण्यास मदत झाली.
जमीन आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शेणखत/ कंपोष्ट खताचा वापर, रासायनिक खतांचा
असंतुलित वापर टाळणे, रासायनिक खतांच्या चुकीच्या मात्रा व त्या देण्याची
अयोग्य पध्दती टाळणे, पाण्याचा योग्य वापर पाण्याचा अतिवापर टाळावा. ठिबक
सिंचन किंवा तुषार सिंचन पध्दतीचा वापर, पिकांच्या शास्त्रोक्त पद्धतीने
फेरपालट, पिकांच्या शेतातील शिल्लक अवशेषांचा नाश करणे, तणांचा वाढणारा
प्रादुर्भाव टाळणे, शेतातील मातीचे परीक्षण करणे व माती परिक्षण
अहवालानुसार खतांची मात्रा देणे, आदि बाबींकडे कटाक्षाने लक्ष पुरविण्याची
गरज येवून ठेपली आहे.
जमीन, जमिनीची उत्पादन क्षमता ही निसर्गाची देणगी आहे. जमिनीचे गुणधर्म टिकविणे किंबहुना सुधारणे आणि उत्पादन क्षमता टिकविणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे. म्हणून निसर्गाची (वातावरण, जमीन आणि पाणी) हानी करणारी किंवा निसर्गाचा समतोल बिघडविणारी कोणतीही क्रिया / प्रक्रिया आपल्या शेती व्यवस्थापनातून वर्ज्य केली पाहिजे.
थोडक्यात माती परिक्षणानुसार खतांचा वापर, स्वस्त व सहज उपलब्ध होणारे सेंद्रिय खत,कंपोष्ट खत, पिकांचे उर्वरित अवशेष, जिवाणू खतासारख्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरावर भर देणे आवश्यक आहे. वापरलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी पीक व जमिनीच्या प्रकारानुसार खतांची निवड, योग्य वेळी वापर, पिकांची फेरपालट, पाणी व्यवस्थापन, सुधारित व संकरित जातींचा वापर इत्यादी बाबींचा एकात्मिक पध्दतीने वापर करणे आवश्यक आहे. जागतिक मृद संवर्धन दिनानिमित्त जमीन आरोग्याबाबत गांर्भीयाने विचार करून शेतीशी संबधित सर्वच घटकांनी वेळीच जागृक होऊन गांभीर्याने व पूर्ण संवेदनशीलपणे उपाय योजना करण्याचा निश्चय केल्यास भारतासारख्या शेतीप्रधान देशाला अशक्य नाही. गरज आहे ती प्रत्यक्ष कृतीची आणि ती आपण सर्वांनीच करण्याचा निश्चय करूया.
रासायनिक खतांच्या असंतुलीत व बेसुमार वापरामुळे जमिनीत जैविक घटकांचा विनाश होऊन जमिनी मृतवत झाल्या. पर्यायाने खतांची कार्यक्षमताही कमी झाली. कमी कार्यक्षमतेमुळे पुन्हा वाढीव वापर आणि पुन्हा जमिनीचा ऱ्हास दृष्टचक्रात आधुनिक उत्पादन पध्दती अडकलेली आहे. या सगळयांचा परिणाम म्हणून उत्पादन खर्च वाढला पण दुसरीकडे उत्पादकतेमधे भरीव वाढ झाली नाही आणि पर्यायाने शेती तोटयात जाण्यास मदत झाली.
जमीन, जमिनीची उत्पादन क्षमता ही निसर्गाची देणगी आहे. जमिनीचे गुणधर्म टिकविणे किंबहुना सुधारणे आणि उत्पादन क्षमता टिकविणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे. म्हणून निसर्गाची (वातावरण, जमीन आणि पाणी) हानी करणारी किंवा निसर्गाचा समतोल बिघडविणारी कोणतीही क्रिया / प्रक्रिया आपल्या शेती व्यवस्थापनातून वर्ज्य केली पाहिजे.
थोडक्यात माती परिक्षणानुसार खतांचा वापर, स्वस्त व सहज उपलब्ध होणारे सेंद्रिय खत,कंपोष्ट खत, पिकांचे उर्वरित अवशेष, जिवाणू खतासारख्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरावर भर देणे आवश्यक आहे. वापरलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी पीक व जमिनीच्या प्रकारानुसार खतांची निवड, योग्य वेळी वापर, पिकांची फेरपालट, पाणी व्यवस्थापन, सुधारित व संकरित जातींचा वापर इत्यादी बाबींचा एकात्मिक पध्दतीने वापर करणे आवश्यक आहे. जागतिक मृद संवर्धन दिनानिमित्त जमीन आरोग्याबाबत गांर्भीयाने विचार करून शेतीशी संबधित सर्वच घटकांनी वेळीच जागृक होऊन गांभीर्याने व पूर्ण संवेदनशीलपणे उपाय योजना करण्याचा निश्चय केल्यास भारतासारख्या शेतीप्रधान देशाला अशक्य नाही. गरज आहे ती प्रत्यक्ष कृतीची आणि ती आपण सर्वांनीच करण्याचा निश्चय करूया.
रोगरोधक मृदा (suppressive soil)
रोगरोधक मृदा (suppressive soil) हे एक आश्चर्य मानले जाते. जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी रोगरोधक मृदा अधळुन येते. इतर ठिकाणी वरचेवर अढळणारे रोग या मृदेतील पिकावर येत नाहीत. अशा मृदेतील रोगांचा प्रसार रोखणारे घटक अनेक वेळा अभ्यासले गेले आहेत. या अभ्यासात काही मित्रसुक्ष्मजीवांचा प्रभाव लक्षात आला. यात आश्चर्याची बाब म्हणजे, रोगरोधक मृदेत शत्रुजिवणूंचा अभाव नसतो, ते हजर असूनही पिकांवर रोगराई पसरवू शकत नाही कारण मित्रजिवाणू सतत त्यांचे दमन व पतन घडवून आणतात. पण जेव्हा असे सूक्ष्मजीव वेगळे करून इतर ठिकाणी वापरले गेले तेव्हा त्यांचा परीणामकारकतेत अनेक चढउतार दिसून आले. त्यावरून स्थावर मृदेतील मुळ मित्रजीवाणूंच्या समूहाचे संवर्धन केले पहिजे असे लक्षात आले. रोगरोधक मृदेच्या उत्पत्तीसाठी पिकाची निवड, त्याचे वाण, मृदेच्या इतर घटकांचे प्रमाण, संवर्धीत होणार्या जीवाणूंचे प्रकार या सर्व गोष्टी लक्षात घेणे अतिशय महत्वाचे ठरते. ज्या पद्धतीने आपण डोळ्याने दिसू शकणाऱ्या घटकांची कळजी घेतो त्याप्रमाणे डोळ्यांने न दिसणाऱ्या मित्रसूक्ष्मजीवांचा अभ्यास करणे नितांत गरजेचे आहे. आपल्या शेतात कोणकोणते मित्रजिवाणू पेरल्याने मुळ मित्रजीवाणूसंग्रहाचे संवर्धन होईल हे बघितले जाणे आवश्यक आहे. मित्रजिवाणू पेरत असताना त्यांचा जैव विविधतेचा विचार करायला हवा. मिट्राजिवाणूंचे एकच वाण सतत वापरुन मुळ मित्रजीवाणूसंग्रहाचे संवर्धन होणे शक्य नाही.
Soil retrogression and degradation
Soil retrogression and degradation are two regressive evolution processes associated with the loss of equilibrium of a stable soil. Retrogression is primarily due to erosion and corresponds to a phenomenon where succession reverts back to pioneer conditions (such as bare ground). Degradation is an evolution, different of natural evolution, related to the locale climate and vegetation. It is due to the replacement of the primitive vegetation (known as climax) by a secondary vegetation. This replacement modifies the humus composition and amount, and impacts the formation of the soil. It is directly related to human activity. Soil degradation may also be viewed as any change or disturbance to the soil perceived to be deleterious or undesirable.[1]
At the beginning of a soil formation, only the bare rock outcrops. It is gradually colonized by pioneer species (lichens and mosses), then herbaceous vegetation, shrubs and finally forest. In parallel a first humus-bearing horizon is formed (the A horizon), followed by some mineral horizons (B horizons). Each successive stage is characterized by a certain association of soil/vegetation and environment, which defines an ecosystem.
After a certain time of parallel evolution between the ground and the vegetation, a state of steady balance is reached; this stage of development is called climax by some ecologists and "natural potential" by others. Succession is the evolution towards climax. Regardless of its name, the equilibrium stage of primary succession is the highest natural form of development that the environmental factors are capable of producing.
The cycles of evolution of soils have very variable durations, between tens- hundreds- and thousand-year-old for soils of quick evolution (A horizon only) to more than a million of years for soils of slow development. The same soil may achieve several successive steady state conditions during its existence, as exhibited by the Pygmy forest sequence in Mendocino County, California. Soils naturally reach a state of high productivity from which they naturally degrade as mineral nutrients are removed from the soil system. Thus older soils are more vulnerable to the effects of induced retrogression and degradation
Borgata Hotel Casino & Spa: Review & Opening Hours | Dr.MCD
ReplyDeleteBorgata Hotel Casino 문경 출장샵 & Spa has a good 김천 출장마사지 reputation as one of the safest in 서귀포 출장안마 Atlantic City. The 충청북도 출장안마 rooms are spacious and feature an amazing view 여주 출장마사지 of the
मस्त माहिती
ReplyDelete